‘त्या’ तरुणाची गोगोर्इंविरुद्ध तक्रार
By admin | Published: May 26, 2017 01:09 AM2017-05-26T01:09:22+5:302017-05-26T01:09:22+5:30
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी लष्कराने जीपच्या बॉनेटला ‘मानवी ढाल’
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी लष्कराने जीपच्या बॉनेटला ‘मानवी ढाल’ म्हणून बांधून गेल्या महिन्यात बडगाम आणि परिसरातील गावांमध्ये ज्याची धिंड काढली, त्या फारुख अहमद दर या काश्मिरी युवकाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे याचिका केली आहे.
या कृतीने मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचे जाहीर करून त्याबद्दल आपल्याला भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती फारुख अहमदने केली आहे. ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले, त्या मेजर नितिन लीतुल गोगोई यांचा लष्करप्रमुखांनी, काश्मीरमधील घुसखोरीच्या विरोधात सातत्याने उत्तम कामगिरी केल्याबद्दल’गौरव केला आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्याचा गौरव करणे चुकीचे असल्याने हा पुरस्कार रद्द करावा, अशीही मागणी फारुखने केली आहे.