कॅबिनेट बैठकीत अमित शहांच्या शेजारी बसणारे नरेंद्र मोदी होम क्वारंटाईन होणार?; काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:13 PM2020-08-03T13:13:09+5:302020-08-03T13:13:41+5:30
कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 लाखांचा टप्पा पार केला आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची चाचणी करुन स्वत: होम क्वारंटाईन होणार का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास ट्विट करत म्हणाले की, बुधवारी (29 जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत, असा सवाल श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे.
बुधवार को सम्पन्न कैबिनेट बैठक में गृह मंत्री श्री अमित शाह एवं प्रधानमंत्री अगल-बगल में मौजूद थे,
— Srinivas B V (@srinivasiyc) August 2, 2020
क्या प्रधानमंत्री भी अब सेल्फ क्वारन्टीन होंगे या नियम सिर्फ आम जनता के लिए है ?
कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. "रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोरोना टेस्ट करावी" असं आवाहन अमित शहा यांनी केलं होतं.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
गेली कित्येक दशके राम मंदिराचा वाद चालू होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल अखेर लागला व राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला होता. आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे आता अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याने नरेंद्र मोदी यांना क्वारंटाईन करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र तरीही राम भूमीपूजनात कोणताही बदल करण्यात आल्याचे सांगितले गेले नसल्याने, हा सोहळा होणारच असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, रविवारी (2 जुलै) भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अमित शहांसह कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.