धीरेंद्र शास्त्रींना भेटण्यासाठी बागेश्वर धामला गेलेला शिक्षक अचानक झाला बेपत्ता; पत्नी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 11:36 AM2023-02-19T11:36:24+5:302023-02-19T11:46:29+5:30
बेपत्ता झालेला ललन कुमार हा एका सरकारी शाळेत शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला दोन मुलंही आहेत.
दरभंगा जिल्ह्यातील बहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील ललन कुमार हा तरुण ४ फेब्रुवारी रोजी धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी बागेश्वर धामला जाण्यासाठी निघाला होता. बागेश्वर धाममध्ये पोहोचल्यानंतर ललनचं पत्नीशी बोलणं झालं होतं, मात्र ६ फेब्रुवारीपासून ललनचा मोबाइल बंद होता. यानंतर तिला पतीची काहीच माहिती नाही. तरुणाच्या नातेवाईकांनी दरभंगा एसपींना या प्रकरणाची माहिती दिली. शहराचे एसपी सागर कुमार यांनी तातडीने मध्य प्रदेश पोलिसांशी या संपूर्ण घटनेबाबत समन्वय साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेला ललन कुमार हा एका सरकारी शाळेत शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला दोन मुलंही आहेत. पत्नी सविता कुमारी आपला पती सुखरूप घरी परतण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. दरभंगाचे शहर एसपी सागर कुमार यांनी सांगितले की, कुटुंबीय त्यांना भेटायला आले होते. घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बमिथा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरभंगा पोलीस मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. जी काही माहिती मिळेल, ती कुटुंबाला दिली जाईल.
बेपत्ता तरुण ललनची पत्नी सविता कुमारी हिने सांगितले की, ललन कुमार ४ फेब्रुवारीला दरभंगा स्टेशनवरून बागेश्वर धामला निघाला होता. बागेश्वर धामला पोहोचल्यानंतर बोलणं झालं. सहा फेब्रुवारीला शेवटचं बोलल्यानंतर फोन बंद येत आहे. याची माहिती पोलिसांना दिली. सविताने सांगितले की, एका अनोळखी नंबरवरून ललन हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असल्याचा फोन आला. काळजी वाटत आहे. यानंतर ललनने तेथील आमदाराची भेट घेऊन दरभंगाला पाठवण्याची विनंती केल्याचे समोर आलं.
आमदाराने ललनला तिथल्या पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र पोलिसांनी त्याला कुठे नेले हे कळलं नाही. नवरा अजून घरी परतला नाही असं म्हटलं आहे. दरभंगा येथे पोहोचलेले माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी बेपत्ता ललन प्रकरणाबाबत नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला. बिहारमध्ये सरकारच गायब असल्याचे ते म्हणाले. सरकार अजिबात नाही. ते म्हणाले की, पूर्वी कोणी बेपत्ता झाले की पोलीस त्याला पाताळातूनही शोधून बाहेर काढायचे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"