मोदींच्या हत्येची ‘सुपारी’ मागणाऱ्या तरुणास अटक; फेसबुकवर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:48 AM2019-03-29T01:48:53+5:302019-03-29T01:49:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची ‘सुपारी’ द्यायला कोणी तयार आहे का? अशी विचारणा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकणाऱ्या एका ३१ वर्षांच्या युवकाला जयपूर पोलिसांनी गुरुवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

 Youth seeking Modi's 'betel' arrest; Post on Facebook | मोदींच्या हत्येची ‘सुपारी’ मागणाऱ्या तरुणास अटक; फेसबुकवर पोस्ट

मोदींच्या हत्येची ‘सुपारी’ मागणाऱ्या तरुणास अटक; फेसबुकवर पोस्ट

Next

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची ‘सुपारी’ द्यायला कोणी तयार आहे का? अशी विचारणा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकणाऱ्या एका ३१ वर्षांच्या युवकाला जयपूर पोलिसांनी गुरुवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली.
पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल जैन यांनी या आरोपीचे नाव नवीन कुमार यादव असे असल्याचे सांगितले. यादव मूळचा हरियाणातील रेवाडीचा असून तो जयपूरच्या त्रिवेणीनगर भागात पुस्तकाचे दुकान चालवितो. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १२४ ए (देशद्रोह), ५०५ बी (सार्वजनिक शांततेचा भंग करणे) व ५०६ (धमकावणे) या कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘मोदींची हत्या करण्याची सुपारी द्यायला कोणी तयार आहे का? माझ्याकडे त्यासाठी एक योजना तयार आहे,’ अशी पोस्ट यादव याने २६ मार्च रोजी फेसबूक वॉलवर टाकली होती. उपायुक्त यादव म्हणाले की, या आक्षेपार्ह फेसबूक पोस्टबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने ती पोस्ट कोणी व कुठून टाकली याचा छडा लावून यादव यास अटक केली गेली.
फेसबूकवर आपण अशी पोस्ट टाकली होती व काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर आपण नंतर ती मागे घेतली, अशी कबुली यादव याने जाबजबाबांत दिल्याचेही उपायुक्त जैन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

तात्त्विक मतभेद
मोदींनी केलेले काम आपल्याला पसंत नाही व त्यांच्याशी तात्त्विक मतभेद असल्याने त्यांच्या हत्येचा मानस प्रकट केला, असे समर्थन यादव याने केल्याचेही जैन म्हणाले. ठाणेदार मानवेंद्र सिंग म्हणाले की, यादव याने मोदी व केंद्र सरकारवर टीका करणारा मजकूर यापूर्वीही सोशल मीडियातून प्रसिद्ध केला होता.

Web Title:  Youth seeking Modi's 'betel' arrest; Post on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.