तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून केले लैंगिक अत्याचार, तरुणीविरोधात गुन्हा दाखल

By admin | Published: July 12, 2016 02:12 PM2016-07-12T14:12:15+5:302016-07-12T14:12:15+5:30

अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The youth was summoned by the hotel in a hotel, sexual abuse, lodging a complaint against the girl | तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून केले लैंगिक अत्याचार, तरुणीविरोधात गुन्हा दाखल

तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून केले लैंगिक अत्याचार, तरुणीविरोधात गुन्हा दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 12 - अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीनेच पोलिसांना हॉटेलच्या बाथरुममधून फोन करुन बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. तरुणीचा जबाब घेतल्यानंतर अल्पवयीन तरुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणीने हनी ट्रॅपद्वारे तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये बोलावल्याचं समोर आलं आहे. 
 
दक्षिण दिल्लीतल वसंत कुंज परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी पोलिसांना महिलापूरमधील रॉयल व्यू हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचा फोन आला होता. पोलीस हॉटेलच्या रुममध्ये पोहोचले तेव्हा तरुण तिथेच बसलेला होता. तरुणी त्यावेळी बाथरुममध्ये होती. तरुणीने पोलिसांना आपल्याला फसवून आणलं आणि बलात्कार केला अशी तक्रार केली. 
 
पोलिसांना तरुण अल्पवयीन असल्याची शंका आल्यावर त्यांनी तपास केला असता त्याचं वय 17 असल्याचं कळलं. याचवर्षी त्याने बारावीची परिक्षा पास केली आहे. तरुणाने दिलेल्या जबाबात तरुणीने एक महिन्यापुर्वी फेसबूकवर आपल्याशी मैत्री केली होती अशी माहिती दिली आहे. फेसबुकवरुन अनेकदा चॅटींग केली जात होती. तरुणी अनेकवेळा भेटण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचंही तरुणाने सांगितलं आहे. 
 
तरुणीच्या फेसबूक पेजला कोणताच फोटो नव्हता. तिने रविवारी तरुणाला महिलापूरमधील हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. तरुणाने रुम बूक करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यावर तरुणीने स्वत: बूक करेन असं सांगितलं होतं. तरुणाकडे या सगळ्या संभाषणाचा पुरावा आहे. तरुणीच्या बोलावण्यावर तरुण हॉटेलमध्ये गेला होता. त्याचवेळी तरुणीने बाथरुममध्ये जाऊन आपल्यावर बलात्कार झाल्याचा फोन पोलिसांना केला. 
 
पोलीस दोघांचाही जबाब पडताळून पाहत आहेत. तरुणीच्या तक्रारीच्या आधारे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तरुण अल्पवयीन असल्याने त्याला अटक केली जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तरुणाच्या जबाबाच्या आधारे तरुणीवरही लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर हॉटेलमधील रुम तरुणीनेच बूक केल्याचं समोर आलं आहे. फेसबुकच्या संभाषणावरुनही तरुणीनेच भेटायला बोलावल्याचं सिद्द झालं आहे. तरुणी बलात्काराची धमकी देऊन तरुणाकडून पैसे उकळण्याचा कट रचत असावी असा संशय पोलिसांना आहे. सध्या तपास सुरु आहे.
 

Web Title: The youth was summoned by the hotel in a hotel, sexual abuse, lodging a complaint against the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.