युवतीने फोडला पोलिसाचा मोबाईल दुचाकीवर कारवाईवरून संताप : दोघांना अटक
By admin | Published: December 8, 2015 12:03 AM2015-12-08T00:03:27+5:302015-12-08T00:03:27+5:30
जळगाव- विना चालक परवाना दुचाकी नेत असतानाच ती वाहतुकीस अडथळा ठरल्याने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याने कारवाई केल्याने धरणगाव येथील युवतीने संबंधित कर्मचार्याचा मोबाईल फोडला. तसेच संबंधित कर्मचार्यास अर्वाच्च भाषाही वापरली. या प्रकरणी संबंधित युवतीसह तिच्यासोबतच्या एका युवकास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुवर्णा हरिहर पाटील व संतोष पाटील दोघे रा.धरणगाव, असे आरोपींचे नाव आहे.
Next
ज गाव- विना चालक परवाना दुचाकी नेत असतानाच ती वाहतुकीस अडथळा ठरल्याने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याने कारवाई केल्याने धरणगाव येथील युवतीने संबंधित कर्मचार्याचा मोबाईल फोडला. तसेच संबंधित कर्मचार्यास अर्वाच्च भाषाही वापरली. या प्रकरणी संबंधित युवतीसह तिच्यासोबतच्या एका युवकास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुवर्णा हरिहर पाटील व संतोष पाटील दोघे रा.धरणगाव, असे आरोपींचे नाव आहे. यासंदर्भात जिल्हा पेठ पोलिसात युवती व युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. नवीन बसस्थानकासमोर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. बसला दुचाकीचा अडथळासंतोष पाटील व सुवर्णा पाटील हे दुचाकीने (क्र.एमएच १९ वाय ५९९०) नवीन बसस्थानकाकडून जात होते. त्यांची दुचाकी बसस्थानकातून बाहेर येणार्या बसना अडथळा ठरत होती. या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रकाश भागवत पाटील हे या भागात नियुक्तीस होते. त्यांनी दुचाकीस्वार पाटील यांना दुचाकी पुढे नेण्यास सांगितले. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद एवढा झाला की हमरीतुमरीपर्यंत प्रकार घडला. अशातच दुचाकीवर असलेल्या सुवर्णा पाटील हिने संतापात प्रकाश पाटील यांचा स्मार्ट फोन (मोबाईल) धरून तो आपटला. त्यात त्याचे नुकसान झाले. दुचाकी वाहतूक शाखेत सोडलीसंतोष पाटील व सुवर्णा पाटील यांची दुचाकी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आली. ती पाटील यांनी तेथे सोडली. नंतर जिल्हापेठ पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली. पोलीस कर्मचार्याशी असभ्य वर्तन आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी सुवर्णा पाटील व संतोष पाटील यांना अटक करण्यात आली असून, ते जिल्हा पेठ पोलिसांच्या कोठडीत आहेत. प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.