तुम्हालाही थायलंडमधून आयटी जॉबची ऑफर आली? अखंड सावध राहा; वाचा नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:41 PM2022-09-24T17:41:11+5:302022-09-24T17:47:40+5:30
भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.
नवी दिल्ली : भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.यानंतर भारत सरकारने अधिसूचना जारी करुन तरुणांना सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'जर तुम्हाला थायलंड किंवा बाहेरच्या देशात आयटी सेक्टरमध्ये नोकरीची ऑफर आली तरी तुम्ही त्याअगोदर त्या संदर्भात चौकशी करा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमध्ये डिजिटल सेल्स आणि अॅड मार्केटींग एक्झिक्युटीव्ह पदासाठी भारतीय तरुणांना आकर्षक जॉब ऑफर दिली जात आहे.हा पूर्णपण घोटाळा आमि फसवे आहे. हे पूर्णपणे बनावट जॉब रॅकेट आहे, याचा उद्देश तरुणांना अडकवण्याचा आहे.हे रॅकेट क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीचा संशय असलेल्या कॉल सेंटर्स आणि आयटी कंपन्या चालवत आहेत, असंही या अधिसूचनेत म्हटले आहे.
गेल्या काही दिवसात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.यात अनेक आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या भारतीय तरुणांना नोकरीसाठी म्यानमारमध्ये पोहचवले आहे. तिथे त्यांना क्रिप्टोकरन्सी फसवणूक आणि सायबर फसवणूक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करायला लावले आहे. यात अडकलेल्या ३२ भारतीय तरुणांची भारत सरकारने म्यानमारमधून सुटका केली आहे.सध्या थायलंड-म्यानमारमध्ये अडकलेल्या ६० तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली.'भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये नोकरीची ऑफर स्विकारण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. सरकारने भारतीय तरुणांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या खोट्या नोकरीच्या ऑफरपासून सावध राहण्याचा आणि त्यांची सखोल चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.
Jobs: नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढले; नोकरीची संधी वाढली, आयटी क्षेत्रात ५० हजार जणांना मिळाली संधी
भारतीय तरुणांनी बाहेरच्या देशातील नोकऱ्यांची ऑफर स्विकारण्यापूर्वी त्या कंपन्यांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तेसच रिक्रूटिंग एजंटांची चौकशी करण्याचा सल्ला या अधिसूचनेत सरकारने दिला आहे.