Success Story: "IAS पतीपेक्षा मी जास्त कमाई करते", युट्यूबर श्रृती शिवानं सारं गणित दिलखुलासपणे सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:06 PM2022-12-27T19:06:06+5:302022-12-27T19:07:51+5:30

श्रृती शिवा एक युट्यूबर आहे आणि तिचे पती आयएएस अधिकारी आहेत. त्यांची उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पोस्टींग आहे.

youtube creator shruti shiva success story and how she married ias officer abhishek | Success Story: "IAS पतीपेक्षा मी जास्त कमाई करते", युट्यूबर श्रृती शिवानं सारं गणित दिलखुलासपणे सांगितलं...!

Success Story: "IAS पतीपेक्षा मी जास्त कमाई करते", युट्यूबर श्रृती शिवानं सारं गणित दिलखुलासपणे सांगितलं...!

googlenewsNext

श्रृती शिवा एक युट्यूबर आहे आणि तिचे पती आयएएस अधिकारी आहेत. त्यांची उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पोस्टींग आहे. श्रृती शिवानं एका व्हिडिओमध्ये आपण पतीपेक्षाही अधिक कमाई करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर एकच गहजब उडाला. यानंतर आता श्रृतीनं एका मुलाखतीत आपल्या कमाईची माहिती सार्वजनिक का करावी लागली याची माहिती दिली आहे. 

श्रृती शिवानं २ वर्षांपू्र्वीच आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. आता तिच्या युट्यूब चॅनलचे २ लाख १० हजाराहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. श्रृती मूळची उत्तराखंडच्या कोटद्वारची आहे. तर डेहरादून येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. तिनं पब्लिक हेल्थमध्ये मास्टर्स केलं आहे. तसंच अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडामधून पदवी प्राप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. श्रृती लहान असतानाच त्यांचे वडील जग सोडून गेले. आईनंच श्रृती यांना लहानाचं मोठं केलं. २०२० साली आयएएस अधिकारी अभिषेक यांच्यासोबत श्रृती यांचं लग्न झालं. सध्या ती मेरठमध्ये वास्तव्याला आहे. 

"पती अभिषेक यांचं करिअर इतकं स्पेसिफिक आहे की आणि लोकांना ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. एखाद्या नव्या सूटमध्ये मी फोटो टाकला तरी मी पतीच्या पैशातून कपडे खरेदी केले अशा कमेंट्स येतात. खरंतर जगात प्रत्येकजण आपल्या पार्टनरसोबत सारं शेअर करत असतो. पण माझी कमाई मला विचारली जाते. यामुळेच मला युट्यूबमधून अभिषेकपेक्षाही अधिक पैसा मिळतो हे सांगावं लागलं", असं श्रृती हिनं सांगितलं. 

"युट्यूबवर तुमचे ५० हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स झाले की कमाई सुरू होते. तसंच स्पॉनरशिपही मिळू लागते. एक-दोन लाख सब्सक्रायबर्स झाले की स्पॉनरशीपही बंद करण्याची वेळ येते. माझ्या कमाईचा मुख्य स्रोत स्पॉनरशीप हाच आहे. कारण माझ्या व्हिडिओची संख्या खूप कमी आहे", असं श्रृती यांनी सांगितलं. 

श्रृती-अभिषेक यांची प्रेमकहाणी
अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रृती भारतात परतल्या. "माझे पती जे त्यावेळी माझे बॉयफ्रेंड होते आणि त्यांची नोकरी सरकारी आहे. त्यामुळे ते अमेरिकेत येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यासाठी मला भारतात परतावं लागलं", असं श्रृतीनं सांगितलं. 

अभिषेक यांच्याशी पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती असं श्रृती यांनी सांगितलं. त्या डेंटल कॉलेज अँड हॉस्पीटल येथे शिक्षण घेत होत्या. तर अभिषेक आयआयटी रुडकी येथे शिक्षण घेत होते. आयआयटीच्या एका फेस्टीव्हलमध्ये श्रृती यांनी सहभाग घेतला होता. याच दरम्यान अभिषेकचं सुत्रसंचलन श्रृती यांना आवडलं होतं आणि त्याचं कौतुक केलं होतं. फक्त कौतुकाच्या दोन शब्दांनंतर मला कळलंच नाही की केव्हा अभिषेक यांनी माझं सोशल मीडिया अकाऊंट शोधून काढलं आणि फेसबुकवर आमचं बोलणं सुरू झालं. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमाच्या नात्यात झालं, अशी माहिती श्रृती यांनी मुलाखतीत दिली. 

Web Title: youtube creator shruti shiva success story and how she married ias officer abhishek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.