सेल्फीच्या बहाण्याने जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:17 PM2018-10-25T14:17:42+5:302018-10-25T14:18:32+5:30
विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हैदराबाद : विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम विमानतळावर एका हल्लेखोराने जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जगनमोहन रेड्डी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्लेखोराला जगनमोहन रेड्डी यांच्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.
Andhra Pradesh: YSRCP chief Jagan Mohan Reddy stabbed on his arm by unidentified assailant at Visakhapatnam Airport today. More details awaited. pic.twitter.com/lUmmMiaQCi
— ANI (@ANI) October 25, 2018
दरम्यान, असे सांगण्यात येत आहे की, जगनमोहन रेड्डी विशाखापट्टनमहून हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर फ्लाइटची वाट पाहत होते. त्यावेळी हल्लोखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जगनमोहन रेड्डी यांच्याजवळ आला आणि त्याने चाकू हल्ला केला. श्रीनिवास असे या हल्लेखोराचे नाव असून तो विमानतळावरील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजते.
Shocked by attack on Jagan Reddy. Asked all agencies to investigate matter thoroughly,including CISF. Asked secretary civil aviation to fix responsibility. I strongly condemn this cowardly attack,we'll punish the guilty. Investigation underway, tweets Civil Aviation Min S Prabhu pic.twitter.com/NoMB0sfzGR
— ANI (@ANI) October 25, 2018
जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे ऐकून धक्का बसल्याचे सांगत नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Opposition leader Jaganmohan Reddy was attacked at Visakhapatnam airport today. The attacker has been identified as a worker at the airport. He approached Reddy asking him for a selfie & attacked him. He has been taken into custody&inquiry is underway: AP Home Minister NC Rajappa pic.twitter.com/obzg8xICBD
— ANI (@ANI) October 25, 2018