भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 01:23 PM2019-05-26T13:23:50+5:302019-05-26T13:35:43+5:30
पुढच्या काही काळात एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील बहुतांश घटकपक्षांनीही दमदार कामगिरी केली. एनडीएतील घटक पक्षांनी काल मोदींनी आपल्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारुण पराभव करून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Delhi: YSRCP chief Jaganmohan Reddy met Prime Minister Narendra Modi today. V Vijaya Sai Reddy and other leaders of YSRCP were also present. pic.twitter.com/227596XZEx
— ANI (@ANI) May 26, 2019
लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर 303 जागा जिंकल्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये भक्कम बहुमत पाठीशी असलेल्या एनडीएचा अजून विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आज दिल्ली येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर जगनमोहन रेड्डींनी अमित शहांचीही भेट घेतल्याने ते एनडीएमध्ये प्रवेश करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या भेटीवेळी जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना 30 मे रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थिर राहण्याचे निमंत्रण दिले. तसेच आंध्र प्रदेशमधील विविध विकासकामांविषयी मोदींसोबत चर्चा केली. यावेळी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मागणीचा रेड्डींनी पुनरुच्चार केला.
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 175 पैकी 151 तर लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 22 जागा मिळाल्या आहेत.
#WATCH: YSRCP Chief Jaganmohan Reddy arrives in Delhi. He will meet Prime Minister Narendra Modi today. pic.twitter.com/ip3nQilyyU
— ANI (@ANI) May 26, 2019