‘उडता पंजाब’च्या पायरसीप्रकरणी तरुणाला अटक
By admin | Published: June 23, 2016 04:24 AM2016-06-23T04:24:45+5:302016-06-23T04:24:45+5:30
बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आॅनलाइन पायरसी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मुंबईच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. allzmovies.in या संकेतस्थळाचा चालक असलेल्या दीपक कुमार याने १५ जूनला
मुंबई : बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आॅनलाइन पायरसी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मुंबईच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. allzmovies.in या संकेतस्थळाचा चालक असलेल्या दीपक कुमार याने १५ जूनला ‘उडता पंजाब’ अपलोड केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
शाहीद कपूर, करिना कपूर व आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला संमती देताना सेन्सॉर बोर्डाने अनेक कट सुचविले होते. त्यामुळे देशभरात या चित्रपटाची चर्चा सुरू होती. १७ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार असताना दोन दिवस आधीच त्याची पहिली सेन्सॉर कॉपी torrent.com वरून डाऊनलोड करण्यात आली होती. robby007 युजर आयडीवरून तो चित्रपट अपलोड करण्यात आला होता.
सायबर सेलमध्ये त्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये दिल्लीस्थित aaaallzmovies.in या संकेतस्थळाचे नाव पुढे आले. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या पथकाने दिल्लीला जाऊन दीपकचा शोध घेतला. बुधवारी दीपकला मुंबईत सायबर सेलमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याच्या जबाबातून सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणात आणखी काहींचा समावेश आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे सायबर सेलचे उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)