काश्मिरी मुलींना 15 ऑगस्टच्या परेडपासून दूर ठेवा, दहशतवाद्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 05:22 PM2017-08-09T17:22:57+5:302017-08-09T17:23:06+5:30

काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.

zakir musa warns to educational institutes do not force girls to participate in aug15 celebration | काश्मिरी मुलींना 15 ऑगस्टच्या परेडपासून दूर ठेवा, दहशतवाद्यांची धमकी

काश्मिरी मुलींना 15 ऑगस्टच्या परेडपासून दूर ठेवा, दहशतवाद्यांची धमकी

Next

श्रीनगर, दि. 9 - काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी ही धमकी दिली असून, श्रीनगरमध्ये 15 ऑगस्टला होणा-या परेडपासून मुलींना दूर ठेवा, असा इशाराही दहशतवाद्यांनी पालकांना दिला आहे. जाकिर मुसा मेपर्यंत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. मात्र त्यानंतर त्यानं अल कायदाशी हातमिळवणी केली.  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीत अल कायदाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मात्र अद्यापही दोन दहशतवादी लपून बसल्याचं समजल्यामुळे परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.  
सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी अल कायदाशी संबंधित असून, जाकिर मुसाच्या नेतृत्वात ते सक्रिय होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जाहीद आणि इसहाक अशी त्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदानं गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जम बसवण्यासाठी गजवत -ए- हिंद नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली होती. तसेच मुसाला या भागाचं प्रमुख घोषित केलं होतं. सुरक्षा जवानांना त्रालमधल्या गुलाब बागमध्ये तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तरीत्या या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तीही पुलवामा जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्तानं येणार होत्या. मात्र ऐन वेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.  काश्मीरमध्ये सध्या लष्कराचं ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. त्यात त्यांनी दहशतवाद्यांची एक यादी बनवली आहे. यादीनुसार दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात येत आहे. आतापर्यंत 115 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

Web Title: zakir musa warns to educational institutes do not force girls to participate in aug15 celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.