झाकीर नाईकचं भारतीयांना खुंल पत्र
By admin | Published: September 10, 2016 10:52 PM2016-09-10T22:52:46+5:302016-09-11T00:20:08+5:30
मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे
Next
>- ऑनलाइल लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकने भारतीयांना उद्देशून खुल पत्र लिहिलं आहे. मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे. झाकीर नाईक तपास यंत्रणांच्या रडारवर असून तरुणांना दहशतवादी होण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
शातंता आणि एकता भंग करण्यासाठी सरकार मला आरोपी ठरवत आहे. मला दहशतवादाची शिकवण देणारा असं का म्हटलं जात आहे ? असा सवाल झाकीर नाईकने सरकारला विचारला आहे. मला सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून जाणुनबुजून टार्गेट केलं जात आहे. माझ्याविरोधात कोणताच पुरावा मिळाला नसताना सरकार माझ्याविरुद्ध अहवाल तयार करतं आणि तोच अहवाल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जातो असा आरोप झाकीर नाईकने केला आहे.
माझ्याविरोधात जाणुनबुजून कट रचला जात आहे. मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. याला भारताचा असहिष्णू चेहराच म्हणावा लागेल असं झाकीर नाईक बोलला आहे.
झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली होती. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली होती.
झाकीर नाईकच्या ' इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' (आयआरएफ) या संस्थेकडून 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त ' टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. २०११ साली 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' ही देणगी देण्यात आली असून आयआरएफनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देणगी म्हणून देण्यात आलेली ही रक्कम स्वीकारली असली तरीही आयआरएफने ही रक्कम 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला नव्हे तर 'राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट'ला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.