झांझरिया,सरदार सिंह यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 02:32 PM2017-08-03T14:32:59+5:302017-08-03T16:11:05+5:30

 रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत गोल्ड मेडल पटकावणारे  देवेंद्र झांझरिया आणि भारताचा माजी हॉकीपटू सरदार सिंह यांची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Zanjeeria, Sardar Singh, Khel Ratna Award | झांझरिया,सरदार सिंह यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

झांझरिया,सरदार सिंह यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Next
ठळक मुद्दे रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत गोल्ड मेडल पटकावणारे  देवेंद्र झांझरिया आणि भारताचा माजी हॉकीपटू सरदार सिंग यांची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली, दि. 3- रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत गोल्ड मेडल पटकावणारे  देवेंद्र झांझरिया आणि भारताचा माजी हॉकीपटू सरदार सिंह यांची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसंच क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरूवारी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी आयोजीत एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. तर, अर्जुन पुरस्कार हा  क्रीडा क्षेत्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक आणि एक प्रमाणपत्रासह साडे सात लाख रुपयांची रक्कम दिली जाते. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने तब्बल  10 वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच, सरदार सिंहने आठ वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तर 35 वर्षीय देवेंद्र झाझरियाने 2004 आणि 2016 सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीच्या दोन सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला देवेंद्र हा पहिलाच पॅरालिम्पिक खेळाडू ठरला आहे.

 2016 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्णपदक पटकावलं होतं. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ३६ वर्षीय देवेंद्रने ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला. अथेन्समध्ये त्याने ६२.१५ मीटर भालाफेक केला होता. राजस्थानचा असलेला देवेंद्रला २००४ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे.
 

याशिवाय निवड समितीने सतरा खेळाडूंच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. यामध्ये क्रिकेटर चेतेश्वर पुजारा, भारतीय महिला क्रिकेट टीममधील खेळाडू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पिक पदक विजेते मरिय्यपन थंगवेलू, वरूण भाटी, एसएसपी चौरसिया आणि हॉकी खेळाडू एस.व्ही सुनिल यांचा समावेश आहे. 

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

सरदार सिंह, देवेंद्र झांझरिया

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

सत्यव्रत कायदान, अँथनी अमलराज, प्रकाश नंजप्पा, जसवीर सिंह, देवेंद्र सिंह, चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौर, साकेच मैनेनी, बेंबा देवी, मरियप्पन थंगवेलु, वीजे श्वेता, खुशबीर कौर, राजीव अरोकिया, प्रशांति सिंह, एसव्ही सुनील, एसएसपी चौरसिया आणि वरूण भाटी या खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Web Title: Zanjeeria, Sardar Singh, Khel Ratna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.