जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची ३ एप्रिल रोजी निवड

By Admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:31+5:302017-03-23T17:18:31+5:30

अलिबाग : मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी ॲड. आस्वाद पाटील विराजमान झाल्यावर, आता रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी कोण विराजमान होणार, याबाबत राजकीय चर्चा रंगात आल्या आहेत. या सर्व सभापतींच्या निवडीकरिता सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवार, ३ एप्रिल २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात करण्यात आले आहे.

Zilla Parishad Subject Committee members will be elected on April 3 | जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची ३ एप्रिल रोजी निवड

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची ३ एप्रिल रोजी निवड

googlenewsNext
िबाग : मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी ॲड. आस्वाद पाटील विराजमान झाल्यावर, आता रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी कोण विराजमान होणार, याबाबत राजकीय चर्चा रंगात आल्या आहेत. या सर्व सभापतींच्या निवडीकरिता सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवार, ३ एप्रिल २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात करण्यात आले आहे.
विषय समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याकरिता ३ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११ वा. ते दुपारी १ वाजेपर्यंत मुदत राहणार असून, विषय समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी बैठक दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी, जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांमार्फत बैठक सुरू झाल्यानंतर दुपारी २ वाजता करण्यात येईल. नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता मुदत राहील. गरज भासल्यास विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक होईल. असा सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्र म रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी घोषित केला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad Subject Committee members will be elected on April 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.