जि.प. अर्थसंकल्पात तीन कोटींनी घट शक्य

By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:12+5:302016-03-11T00:28:12+5:30

जळगाव- जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये तीन कोटींनी घट येण्याची शक्यता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Zip Budget deficit reduces by three crores | जि.प. अर्थसंकल्पात तीन कोटींनी घट शक्य

जि.प. अर्थसंकल्पात तीन कोटींनी घट शक्य

Next
गाव- जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये तीन कोटींनी घट येण्याची शक्यता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
मुद्रांक शुल्कापोटी जि.प.ला तीन कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) पाणी योजना राबविल्यासंबंधी केलेला खर्च ग्रामपंचायतींकडून मिळत नाही. पाणीप˜ी वसूल होत नसल्याने अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने हा दावा मान्य केला. आता ग्रा.पं.कडून पैसा कसा वसूल करावा यासंबंधीचा विचार झाला. ग्रा.पं.ना मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणार्‍या अनुदानातून आपली थकीत रक्कम वसूल करण्याची परवानगी शासनाने दिली. यामुळे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारे कमाल अनुदान मजीप्राला देण्यात आले आहे. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून तीन कोटी ६३ लाख रुपये अनुदान मिळणार होते. पण तीन कोटी रुपये मजीप्राला देण्यात आल्याने अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये घट होणार आहे. जि.प.चा अर्थसंकल्प आता २१ कोटींवरून १८ कोटींवर येणार असल्याचे स्पष्टीकरण वित्त समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांनी दिले.

मागील अर्थसंकल्प
महाराष्ट्र केसरीला मदत
जि.प. आपल्या परिने आपल्या उत्पन्नातून किंवा निधीतून सायगाव ता.चाळीसगाव येथील महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यास मदत म्हणून निधी देणार आहेत. त्याची घोषणा अर्थसंकल्पीय सभेत होऊ शकते, असे संकेत मिळाले.

Web Title: Zip Budget deficit reduces by three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.