जि.प. कर्मचाऱ्यांची दुष्काळग्र्रस्तांना २१ लाखांची मदत

By admin | Published: August 26, 2015 12:19 AM2015-08-26T00:19:05+5:302015-08-26T00:19:05+5:30

नागपूर : मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी २१ लाखांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केला आहे.

Zip Employees' help to 21 lakhs of drought victims | जि.प. कर्मचाऱ्यांची दुष्काळग्र्रस्तांना २१ लाखांची मदत

जि.प. कर्मचाऱ्यांची दुष्काळग्र्रस्तांना २१ लाखांची मदत

Next
गपूर : मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी २१ लाखांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केला आहे.
जि.प.च्या १२ विभागातील कर्मचाऱ्यांचे १ लाख व पंचायत समित्यातील ८ हजार कर्मचाऱ्यांचे २० लाख अशी ही २१ लाखांची मदत गोळा करून संबंधित विभागाकडे जमा करण्यात आल्याची माहिती कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी मंगळवारी दिली.
दुष्काळग्र्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी जि.प. कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने केले होते. त्यानुसार कास्ट्राईबसह इतर कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांना जून व जुलै महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. याला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी, लिपिकवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन जमा केले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे सोहन चवरे यांच्यासह नरेंद्र धनविजय, परसराम गोंडाणे, नारायण मालखेडे, अशोक राऊ त आदींनी आभार व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Zip Employees' help to 21 lakhs of drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.