Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:32 PM2020-06-28T15:32:34+5:302020-06-28T15:36:18+5:30
सध्या झोमॅटो एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.
कोलकाता - झोमॅटो ही खाद्यपदार्थ पुरवणारी कंपनी अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र सध्या झोमॅटो एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून कंपनीचे टी-शर्ट जाळल्याची घटना समोर आली आहे. लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच दरम्यान झोमॅटो कर्मचाऱ्यांनी देखील निषेध केला आहे.
कोलकातामध्ये झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनी आपले टी-शर्ट जाळून सामूहिक राजीनामा दिला आहे. तसेच झोमॅटोमध्ये चीनची गुंतवणूक आहे त्यामुळे यावर बंदी घालण्यासाठी झोमॅटोच्या माध्यमातून लोकांनी ऑर्डर देऊ नये असे आवाहन देखील कर्मचाऱ्यांनी केलं आहे. 2018 मध्ये चिनी कंपनी अलिबाबाशी संबंधित असलेल्या अँट फायनान्शिय कंपनीने झोमॅटोमध्ये 21 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करुन कंपनीमध्ये 14.7 टक्के शेअर्स खरेदी केले. झोमॅटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 15 कोटी डॉलर्स जमा केल्याची माहिती मिळत आहे.
#WATCH साउथ 24 परगना में ज़ोमैटो डिलीवरी ब्वॉयज़ ने भारतीय कंपनियों में चीनी निवेश का विरोध करते हुए नौकरी से इस्तीफा दिया। विरोध प्रदर्शन के दौरान उन्होंने अपनी जर्सियां जलाईं। #पश्चिम_बंगालpic.twitter.com/inRGxc05KQ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 28, 2020
आपल्याकडून नफा मिळवून आपल्याचं देशाच्या सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनचा निषेध करत असल्याची माहिती आंदोलन करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली आहे. त्यामुळे चीनसोबत संबंध असलेल्या कंपनीसोबत कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार देत राजीनामा दिला आहे. तसेच झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी आपले टी-शर्टही भर रस्त्यात जाळले आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुगल पे च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; सोशल मीडियावर का व्हायरल होतोय 'तो' मेसेज?https://t.co/zqldSNwydq#GooglePay#RBI#money
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार; वेगाने रुग्णांवर उपचार होणार https://t.co/fHYlUVhKNe#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!
Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी खास उल्लेख केलेली 'ती' व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण