जिओला दणका, समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा ट्रायचा आदेश
By admin | Published: April 6, 2017 08:30 PM2017-04-06T20:30:42+5:302017-04-06T21:21:07+5:30
प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला दणका दिला आहे. प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. यासोबतच समर सरप्राइज ऑफरदेखील मागे घेण्यास सांगितलं आहे. जिओकडून ट्रायच्या या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ज्या ग्राहकांनी आधीच या ऑफरसाठी नोंदणी केली आहे त्यांना याचा फटका बसणार नाही.
हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. पण आता ट्रायच्या आदेशाने जिओला दणका बसला आहे.
यापुर्वी सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4G अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली.
जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप-
एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4G सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Foxconn कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.