जि.प.स्थायीची सभा

By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:44+5:302016-02-29T22:01:44+5:30

डीआरडीएची तपासणी तथ्याला धरून नाही

ZP Standing Meeting | जि.प.स्थायीची सभा

जि.प.स्थायीची सभा

Next
आरडीएची तपासणी तथ्याला धरून नाही
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) जे गाळे लाभार्थींना वितरित केले त्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरून आहेत. याबाबत डीआरडीएने यावल तालुक्यात केलेली चौकशी तथ्याला अनुसरून नाही. योग्य चौकशी करावी, अशी मागणी सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली.

औष्णिक प्रकल्पातर्फे जलशुद्धीकरण यंत्रणा बसवावी
फुलगाव, कठोरा, जाडगाव, मन्यारखेडा या दीपनगर औष्णिक वीज केंद्र परिसरातील गावांमध्ये दीपनगर औष्णिक प्रकल्पातून पाईपलाईनद्वारे सोडल्या जाणार्‍या राखेद्वारे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खराब होत आहेत. या पाईपलाईनला गळती लागल्यानंतर राख वेल्हाळे तलावात जाते. या तलावानजीकच्या विहिरींमध्ये या राखेचे अंश येतात, यामुळे प्रकल्पाच्या संबंधितांनी या प्रकाराची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

Web Title: ZP Standing Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.