Zydus Cadila: मोठी बातमी! 'झायडस कॅडिला'च्या 'अँटिबॉडी कॉकटेल'ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:16 PM2021-06-04T12:16:13+5:302021-06-04T12:16:41+5:30

Zydus Cadila: कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्डसोबतच लवकरच आणखी एका अँटिबॉडी कॉकटेलची भर पडणार आहे.

zydus cadila gets permission for clinical trials of antibodies cocktail to treat covid | Zydus Cadila: मोठी बातमी! 'झायडस कॅडिला'च्या 'अँटिबॉडी कॉकटेल'ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

Zydus Cadila: मोठी बातमी! 'झायडस कॅडिला'च्या 'अँटिबॉडी कॉकटेल'ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

Next

Zydus Cadila: कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्डसोबतच लवकरच आणखी एका अँटिबॉडी कॉकटेलची भर पडणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोरोनावरील अँटिबॉडी कॉकटेल औषधाच्या वैद्यकीय चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. नुकतंच कंपनीनं ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अँटीबॉडी कॉकटेलच्या चाचणीसाठी मंजुरी मागितली होती. (zydus cadila gets permission for clinical trials of antibodies cocktail to treat covid)

महत्वाची बाब अशी की झायडस कॅडिला ही एकमेव भारतीय कंपनी आहे की ज्या कंपनीनं कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीवर आधारित कॉकटेल अँटीबॉडी विकसीत केली आहे. ही लस कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, मोनोक्लोनल अँटिबॉडी हे एक असं रसायन आहे की जे नैसर्गिक अँटिबॉडी कॉपी करतं जे शरीरातील संक्रमणाविरोधात लढण्यासाठी तयार होतं. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सुरक्षित आणि जास्त प्रभावशाली औषध शोधण्याची जास्त गरज आहे. याकाळात कोरोनाचा त्रास कमी होऊ शकेल अशा पर्यायांची चाचपणी होणं अतिशय गरजेचं आहे, असं झायडस हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितलं. 
 

Web Title: zydus cadila gets permission for clinical trials of antibodies cocktail to treat covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.