Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:55 PM2021-05-30T19:55:30+5:302021-05-30T20:01:43+5:30
Coronavirus : कंपनी आपल्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन वापरास मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथील झायडस कॅडिला (Zydus Cadila) ग्रुप 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोना व्हायरसची (Coronavirus) झायकोव्ह-डी (ZyKov-D) ही लसीच्या चाचणीसाठी योजना आखत आहे. झायकोव्ह-डी ही प्लाझमिड डीएनए लस आहे, जी न्यूक्लिएक अॅसिड लसअंतर्गत येते. अलीकडेच, झायडस कॅडिलाने प्रौढांसाठी 800 क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत, तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठीही लसीची चाचणी घेण्यात आली आहे. (coronavirus: Zydus Cadila Working to Get Nod for Its 'Plasmid DNA' Covid Vaccines for 5-12 Age Group)
कंपनी आपल्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन वापरास मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरविल पटेल म्हणाले की, "आमच्याकडे 5 ते 12 वयोगटातील मुलांवरील लसीच्या चाचणीशी संबंधित चांगला डेटा असणार आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीला मान्यता मिळेल".
(मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील' )
'मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरेल लस'
शरविल पटेल म्हणाले, "लसीचा विकास हा नेहमीच टप्प्यात असतो, पहिल्यांदा ज्येष्ठांसाठी, नंतर मुलांसाठी आणि त्यानंतर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी. आमची लस मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरेल. कोणतेही दुष्परिणाम दिसून येणार नाहीत. जसे की इतर लसींमध्ये सामान्यतः पाहिले जाते. या लसीचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये इंजेक्शनची आवश्यकता लागणार नाही."
कोर्टाने आरोपी कॅप्टनला 5 हजार डॉलर दंड ठोठावला आहे. #Airplanehttps://t.co/s3BrTEY4it
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2021
अलीकडेच, झायडस कॅडिलाने कोरोना व्हायरच्या उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या मानवी क्लिनिकल चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली आहे. "झायडस कोरोना व्हायरसच्या ZRC-3308 लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी डीसीजीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे", असे कॅडिला हेल्थकेअरने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या दोन मोनोक्लोनल अँटीबॉडीजची कॉकटेल आहे. झायडस कॅडिलाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कॉकटेल-आधारित मोनोक्लोनल अँटीबॉडी विकसित करणारी कॅडिला हेल्थकेअर भारतातील एकमेव कंपनी आहे.
फ्रीचार्जची नवीन सर्व्हिस, आता शॉपिंग करा अन् महिन्यानंतर पेमेंट द्या... https://t.co/Gls3dwLgju#FreechargePayLater#Freecharge
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2021