सानपाडामध्ये अतिक्रमणावर कारवाई
By admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:12+5:302015-08-23T20:40:12+5:30
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सिडकोने कारवाई केली. दुकानांबाहेरील शेड हटवून फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त केले आहेत.
Next
न ी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सिडकोने कारवाई केली. दुकानांबाहेरील शेड हटवून फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त केले आहेत. सिडकोने सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर नागरिकांच्या सुविधेसाठी किऑस्क (छोटी दुकाने) तयार केली आहेत. नागरिकांना खाद्यपदार्थ व इतर वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे सुनियोजित मार्केट तयार केले आहे. परंतु येथील व्यावसायिकांनी दुकानांच्या समोरील जागेवर अतिक्रमण केले आहे. टेम्प्टेशन, स्क्वेअर व इतर हॉटेलचालकांनी दुकानाबाहेर मोठे तंबू ठोकले आहेत. सर्वच दुकानदारांनी ५ फुटांपासून ५० फुटांपर्यंत जागेवर अतिक्रमण केले आहे. यामुळे रेल्वे स्टेशन परिसर बकाल झाला आहे. सिडकोने शुक्रवारी या अतिक्रमणावर कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने शेड हटविण्यात आली. सिडकोने हॉटेलचालकांकडील फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्यही जप्त केले आहेत. सिडकोने शुक्रवारी कारवाई सुरू केल्यानंतर येथील अनेक फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. परंतु शनिवारी पुन्हा फळ, भाजी व इतर विक्रेत्यांनी दुकानांच्या बाहेर पुन्हा अतिक्रमण केले आहे. हॉटेल चालकांनीही एक दिवसामध्ये पुन्हा शेड उभे केले असून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. फोटो२२सानपाडा कारवाई, नावाने आहे