धर्ती पटेलनं जिंकली राष्ट्रीय ई-किकबॉस्किंग स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:13 PM2020-07-04T13:13:06+5:302020-07-04T13:13:43+5:30

8 महिन्यांपूर्वी तिनं किक बॉक्सिंग शिकण्यास सुरुवात केली होती. 

10-year-old Dharti Patel from BHIS Baroda wins E-kickboxing  | धर्ती पटेलनं जिंकली राष्ट्रीय ई-किकबॉस्किंग स्पर्धा!

धर्ती पटेलनं जिंकली राष्ट्रीय ई-किकबॉस्किंग स्पर्धा!

Next

कोरोना व्हायरसच्या संकटात मैदानी स्पर्धा स्थगित झाल्या असल्या तरी ई-स्पर्धांच्या निमित्तानं मुलांना खेळात व्यग्र ठेवण्यात येत आहे. नुकतीच राष्ट्रीय ई किकबॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली आणि त्यात बरोड्याच्या 10 वर्षीय धर्ती पटेलनं जेतेपद पटकावलं. ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वात युवा खेळाडू आहे. ती येथील बिलाबाँग इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये शिकते. मागील चार वर्षांपासून ती कराटे शिकत आहे. 8 महिन्यांपूर्वी तिनं किक बॉक्सिंग शिकण्यास सुरुवात केली होती. 

गुजरात किक बॉक्सिंग असोसिएसनतर्फे  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 29 एप्रिलला राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली आणि त्यात धर्तीनं बाजी मारली. त्यानंतर 2 मे रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिनं सुवर्णपदक जिंकले.  या स्पर्धेत 700 हून अधिक स्पर्धकांही सहभाग घेतला होता.  

Web Title: 10-year-old Dharti Patel from BHIS Baroda wins E-kickboxing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात