100 डेज टू गो
By admin | Published: April 27, 2016 05:37 AM2016-04-27T05:37:07+5:302016-04-27T11:00:52+5:30
ब्राझिलमध्ये आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी शंभर दिवस बाकी आहेत.
Next
रिओ दी जानेरिओ : ब्राझिलमध्ये आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी शंभर दिवस बाकी आहेत. 100 डेज्चा काउंटडाउन रिओमध्ये जल्लोषात करण्यात आला.
ही स्पर्धा ५ ते २१ आॅगस्टदरम्यान होणार आहे. २०६ देशांचे संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धेत सहभागी होतील. यामध्ये एकूण १०,५०० खेळाडू विविध क्रीडा प्रकारातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांच्या शर्यतीत आपल्या जिवाची बाजी लावतील. या स्पर्धेत भारतातून जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी,
कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, हॉकी (पुरुष/महिला), अॅथलेटिक्स या खेळांमधून खेळाडूंनी पात्रता पूर्ण केली आहे.
(वृत्तसंस्था)