भारतासमोर विजयासाठी 100 धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 05:40 PM2016-06-20T17:40:12+5:302016-06-20T18:03:10+5:30

भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज दुसरा टी-२० सामना होत असून, या सामन्यात झिम्बाब्वेने भारताला 100 धावांचे आव्हान दिले. झिम्बाब्वेने या सामन्यात 9 गड्यांच्या मोबदल्यात 99 धावा केल्या.

A 100 runs challenge for India | भारतासमोर विजयासाठी 100 धावांचे आव्हान

भारतासमोर विजयासाठी 100 धावांचे आव्हान

Next
>ऑनलाइन लोकमत 
हरारे, दि.२० - भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज दुसरा टी-२० सामना होत असून, या सामन्यात झिम्बाब्वेने भारताला 100 धावांचे आव्हान दिले. झिम्बाब्वेने या सामन्यात 9 गड्यांच्या मोबदल्यात 99 धावा केल्या. 
झिम्बाब्वेकडून फलंदाज पाजे मूर (३१) अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. एल्टन चिगुम्बुरा आणि हॅमिल्टन मासकाद्जा यांनी प्रत्येकी दहा धावा कुटल्या. तर भारताकडून गोलंदाज बी. सरनने भेदक मारा करत चार, बुमराने तीन फलंदाज बाद केले. 
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने शनिवारी गमावला होता. मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आज विजय आवश्यक आहे. 
पहिल्या सामन्यातील चूका या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टाळल्याचे दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या झिम्बाब्वेचा डाव भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गडगडला. 
 
 

Web Title: A 100 runs challenge for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.