वय १२ वर्षे; किताब आंतरराष्ट्रीय मास्टरचा; गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 07:29 PM2019-02-24T19:29:13+5:302019-02-24T19:29:28+5:30

एखाद्या खेळाची ओळख करून घेण्याच्या वयातच जर त्या खेळात प्रावीण्य मिळवले तर आर्श्चयच.

12 year's leon luke mendonca become international master | वय १२ वर्षे; किताब आंतरराष्ट्रीय मास्टरचा; गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात मानाचा तुरा

वय १२ वर्षे; किताब आंतरराष्ट्रीय मास्टरचा; गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात मानाचा तुरा

Next

- सचिन कोरडे

पणजी : एखाद्या खेळाची ओळख करून घेण्याच्या वयातच जर त्या खेळात प्रावीण्य मिळवले तर आर्श्चयच. अशीच आश्चर्यचकित करणारी  कामगिरी गोव्याच्या अवघ्या १२ वर्षीय चिमुरड्याने केलीय. या चिमुरड्याच्या कामगिरीचे कौतुक आता संपूर्ण देशातून होत आहे. लेयॉन मेंडोन्सा हे नाव आता बुद्धिबळ क्षेत्राला परिचयाचे झाले आहे. 

अवघ्या १२ वर्षीय या खेळाडूने १७ दिवसांत आंतरराष्ट्रीय मास्टरचा नॉर्म मिळवला. सर्बियातील स्पर्धांत जबरदस्त कामगिरी करीत त्याने तीन नॉर्म मिळवले. तीन स्पर्धांत २७ फेºयांत लेयॉनने १८.५ गुण मिळवले. आता तो २४४६ या मानांकन गुणांवर पोहचला आहे. त्याचा हा प्रवास लवकरच ग्रॅण्डमास्टरकडे जाणारा आहे. असे झाल्यास लेयॉन गोव्यातील सर्वात कमी वयाचा ‘ग्रण्डमास्टर’ म्हणूनही पुढे येईल. त्यामुळे त्याच्या पुढील कामगिरीकडे गोमंतकीय बुद्धिबळ क्षेत्राचे लक्ष असेल. 

लेयॉन हा दोन वर्षांत अधिक प्रकाशात आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचे चेन्नईतील प्रशिक्षक रमेश हे लेयॉन याला मार्गदर्शन करीत आहेत. बुद्धिबळासाठी संपूर्ण वेळ मिळावा यासाठी लेयॉनला चेन्नईच्या शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेकडून त्याला स्पर्धांसाठी तसेच बुद्धिबळ खेळण्यासाठी पूर्ण सवलत दिली जात आहे. हजेरीच्या टक्केवारीची कुठलीही अट नाही. त्यामुळे त्याला बिनधास्तपणे स्पर्धांत भाग घेता येते. आश्चर्य म्हणजे लेयॉनच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी नोकरीवरही पाणी सोडले. लेयॉनसोबत सर्वाधिक वेळ देता यावा आणि त्याच्या प्रत्येक अडचणी समजून घेता याव्यात यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. लेयॉनची आई संध्या ही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला आहे. लेयॉनची मोठी बहीण ही सुद्धा चांगली कलाकार आहे. लेयॉनला बालपणापासून बुद्धिबळचे आकर्षण होते. त्याच्यातील बुद्धिबळचे कौशल्य विकसित झाले ते गेल्या दोन-तीन वर्षांत. लेयॉनची खेळाबद्दलची जिज्ञासा हेच त्याच्या यशाचे गमक असल्याचे त्याचे प्रशिक्षक सांगतात. 

लेयॉनबद्दल सांगताना गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर म्हणाले की, देशात २००६ मध्ये जन्मलेल्या बºयाच खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे. मात्र, लेयॉनने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे ती या सर्वांपेक्षा चमकदार अशी आहे. काहीतरी वेगळेपण असलेला हा खेळाडू आहे. 

अनुराग म्हामल आणि रोहन आहुजा या दोन खेळाडंूनंतर आंतरराष्ट्रीय मास्टरच नॉर्म मिळवणरा हा सर्वात कमी वयाचा गोमंतकीय खेळाडू आहे. लेयॉन ज्या पद्धतीने खेळत आहे त्यावरून तो गोव्याचा सर्वात कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकविणारा खेळाडू होईल, यात शंका नाही. ‘आयएम’  किताब मिळाल्यानंतर लेयॉनला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरळ प्रवेश तसेच इतर सुविधांचा लाभ मिळेल. लेयॉनचे फिडे या जागतिक संघटनेकडून कौतुक करण्यात आले आहे. त्याला लवकरच प्रशस्तिपत्रही बहाल करण्यात येईल. गोवा बुद्धिबळ संघटना त्यासाठी प्रयत्नरत आहे, असे बांदेकर यांनी सांगितले.
 

Web Title: 12 year's leon luke mendonca become international master

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.