१४ पैलवान, ५ सुवर्ण, एकूण १३ पदके
By admin | Published: August 1, 2014 11:59 PM2014-08-01T23:59:53+5:302014-08-01T23:59:53+5:30
फिलाचे नवे बदल आणि बदलत्या वजन गटानंतरही भारतीय पैलवानांनी दमदार कामगिरी करताना ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीला नव्या उंचीवर पोहोचवले.
नवी दिल्ली : फिलाचे नवे बदल आणि बदलत्या वजन गटानंतरही भारतीय पैलवानांनी दमदार कामगिरी करताना ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीला नव्या उंचीवर पोहोचवले.
भारताने या स्पर्धेत एकूण १४ मल्लांना उतरवले होते. त्यात पाच सुवर्णपदकांसह एकूण १३ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत फक्त एकच पैलवान जिंकण्यात यशस्वी ठरू शकला नाही. भारताने या स्पर्धेत कुस्तीत एकूण ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण १३ पदके जिंकली. कुस्तीच्या पदकतालिकेत कॅनडानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कॅनडाने ७ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्यसह एकूण १२ पदके जिंकली. नायजेरियानेदेखील कडवी झुंज देताना २ सुवर्ण, २ रौप्य आणि ८ कांस्यसह एकूण १२ पदकांची लूट केली. (वृत्तसंस्था)