कसोटीची १४० वर्षे
By admin | Published: March 16, 2017 01:20 AM2017-03-16T01:20:30+5:302017-03-16T01:20:30+5:30
कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता.
कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता. आॅस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) झालेल्या या सामन्यात इंग्लंडला ४५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इग्लंडने पुढील सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती.
भारताने १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. भारताने आतापर्यंत ५१० कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १३८ सामन्यांत विजय तर १५८ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. २१३ सामने अनिर्णित राहिले होते. एक सामना ‘टाय’ होता. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम इग्लंडच्या नावावर आहे. इग्लंडने ९८९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ३५१ सामने जिंकले असून २८९ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. इग्लंडने ३४३ सामने अनिर्णित सोडवले. आॅस्ट्रेलियाने ७९९ कसोटी सामने खेळले असून त्यांनी ३७७ सामने जिंकले आहेत. आॅस्ट्रेलियाने केवळ २१४ सामने गमावले आहेत.
बांगलादेश हा सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा संघ आहे. त्यांनी ९९ कसोटी सामने खेळले असून त्यात केवळ ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी ७६ सामने गमावले आहेत. बांगलादेशने १५ सामन्यांत बरोबरी साधली आहे. जगात एकूण १० संघ कसोटी सामने खेळत आहेत. ज्यामध्ये आॅस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
संकलन-सचिन कोरडे