आॅलिम्पिकसाठी १५ खेळाडू पात्र : हे वर्ष ठरले महत्त्वाचे

By admin | Published: December 20, 2015 11:50 PM2015-12-20T23:50:26+5:302015-12-20T23:50:26+5:30

भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी २०१५ वर्ष संमिश्र यशाचे ठरले. ज्यात १५ खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि युवा खेळाडू दुती चंदचा जागतिक संघटना आयएएफविरुद्ध ऐतिहासिक विजय हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.

15 players eligible for the Olympics: This year will be important | आॅलिम्पिकसाठी १५ खेळाडू पात्र : हे वर्ष ठरले महत्त्वाचे

आॅलिम्पिकसाठी १५ खेळाडू पात्र : हे वर्ष ठरले महत्त्वाचे

Next

नवी दिल्ली : भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी २०१५ वर्ष संमिश्र यशाचे ठरले. ज्यात १५ खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि युवा खेळाडू दुती चंदचा जागतिक संघटना आयएएफविरुद्ध ऐतिहासिक विजय हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.
भारताने अद्यापपर्यंत आॅलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचे खाते उघडले नाही; परंतु आतापर्यंत १५ खेळाडू पात्र ठरल्यामुळे पुढील वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे ट्रॅक अँड फिल्डचे पथक मोठे होण्याची शक्यता आहे.
भारताचा दिग्गज थाळीफेकपटू विकास गौडा हा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आयएएफने सहभागींची संख्या निश्चित केल्यानंतर क्वालिफिकेशन स्तर ६६ मीटरवरून ६५ मीटर केला. गौडाने मे महिन्यात जमैका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ६५.१४ मीटर थाळीफेक करीत आपला सहभाग निश्चित केला होता.
बीजिंगमध्ये आॅगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. यात फक्त ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. ती आठव्या स्थानी राहिली होती. यादरम्यान तिने ९ मिनीट २७.८६ सेकंद वेळेचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या गौडा याने तिसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; परंतु ६३.८४ मीटरच्या निराशाजनक कामगिरीने तो नवव्या स्थानी राहिला.
चीनच्या वुहान विश्व चॅम्पियनशिपच्या दोन महिन्याआधी झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताची कामगिरी प्रभावी ठरली. भारतीय पथकाने चार सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके जिंकताना तिसरे स्थान मिळवले. २००७ नंतर ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या स्पर्धेत भारतासाठी इंद्रजितसिंह, गौडा, ललिता आणि टिंकू लुका यांनी सुवर्णपदक जिंकले. मैदानाबाहेर दुती चंदचे प्रकरण गाजले. दुतीने आयएएफच्या हाइपरएंड्रोगेनिज्म धोरणाविरुद्ध यशस्वीपूर्ण लढा दिला. या धोरणानुसार ज्यांच्यात पुरुष हार्मोनचा (ग्रंथी) स्तर स्वीकृत मर्यादेपेक्षा अधिक आहे अशा महिलांना स्पर्धेसाठी परवानगी दिली जात नाही. अँडोजनचा स्तर अधिक झाल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ च्या संघात स्थान मिळवू न शकणाऱ्या दुतीने आयएएएफच्या धोरणाविरुद्ध खेल पंचायतमध्ये अपील केले होते. स्वित्झर्लंडस्थित खेल पंचायतचा अंतिम निर्णयानंतर दुतीला जवळपास एका वर्षाच्या ब्रेकनंतर अ‍ॅथलेटिक्समधील तिची कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जागतिक संघटनेतही भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या रूपाने भारताला महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व मिळाले.
आदिल सुमारीवाला यांना जागतिक स्पर्धेआधी झालेल्या निवडणुकीत त्याचा सदस्य म्हणून निवडण्यात आले. माजी आॅलिम्पिक चॅम्पियन सॅबेस्टियन यांची या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवड झाली. दरम्यान अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रथमच ब्रिटनचे आॅलिम्पियन डेरेक बुसे यांना हाय परफॉर्मन्स संचालक नेमण्यात आले. त्यांचे लक्ष्य २०२० आॅलिम्पिकपर्यंत भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये कमीत कमी एक पदक मिळवून देणे हे आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: 15 players eligible for the Olympics: This year will be important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.