दिल्ली डेअरव्हिल्स समोर १६४ धावांचे आव्हान
By admin | Published: May 9, 2015 09:30 PM2015-05-09T21:30:14+5:302015-05-09T21:30:58+5:30
ऑनरिकेजने ४६ चेंडूत ७६ धावा करत सनरायजर्स हैद्राबाद मधील फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकत सनरायजर्स हैद्राबादने फलंदाजी
Next
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ९ - ऑनरिकेजने ४६ चेंडूत ७६ धावा करत सनरायजर्स हैद्राबाद मधील फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
नाणेफेक जिंकत सनरायजर्स हैद्राबादने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी वीर शिखर धवन व कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना फार काळ मैदानावर टिकता आले नाही. शिखर धवन १३ धावा झाल्या असताना जहीरच्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असताना मोर्केलकडे झेल गेल्याने बाद झाला. तर, डेव्हिड वॉर्नर कोल्टरच्या चेंडूवर तिवरेकडे झेल गेल्याने बाद झाला. यानंतर आलेल्या मोरगनने २२ धावा झाल्या असताना यादवच्या चेंडूवर खेळत असताना कोल्टरकडे झेल गेल्याने बाद झाला त्यामुळे सनरायजर्सच्या समर्थकांची निराशा झाली.