१९८३ - भारत जगज्जेता
By admin | Published: February 15, 2015 03:46 PM2015-02-15T15:46:21+5:302015-02-15T15:46:21+5:30
सलग तिस-यांदा विश्वचषकाचे आयोजन करत इंग्लंडने हॅट्रीक साधली. ९ ते २५ जून, १९८३ या कालावधीत खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या विश्वचषकांत आठ संघ सहभागी झाले होते
Next
>सलग तिस-यांदा विश्वचषकाचे आयोजन करत इंग्लंडने हॅट्रीक साधली. ९ ते २५ जून, १९८३ या कालावधीत खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या विश्वचषकांत आठ संघ सहभागी झाले होते. पहिल्या दोन स्पर्धांतील विश्वविजेता वेस्ट इंडीज, यजमान इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे संघ यामध्ये सहभागी झाले होते. फॉर्मेटही गेल्या दोन विश्वचषकांप्रमाणेच ठेवण्यात आला होता.
दोन वेळा विजेतेपद पटकावणा-या वेस्ट इंडिजचे या विश्वचषकात पारडे जड समजले जात होते. मात्र अनपेक्षित निकालांनी विश्वचषक कमालीचा रंगला. अंतिम सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करत भारत नवा विश्वविजेता बनला होता. अंतिम सामन्यात भारताने १८३ धावांचे लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १४० धावांमध्ये तंबूत परतला.
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - २७
एकूण धावा - १२, ०४६
एकूण विकेट्स - ४१०
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - डेव्हिड गोवर - इंग्लंड ( सात सामन्यांमध्ये ३८४ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - रॉजर बिन्नी - भारत (सात सामन्यांमध्ये १८ विकेट्स)