२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

By Admin | Published: April 4, 2015 04:06 AM2015-04-04T04:06:24+5:302015-04-04T04:06:24+5:30

चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून

20-T per cent all-rounder in the air ... | २०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

googlenewsNext

विशाल शिर्के , पुणे
चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान झाले असल्याचे यंदाच्या विश्वचषकात पाहायला मिळाले.
आयपीएलची ही खासियत टिकवून ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापक देखील आता अधिक गुणवान क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी अष्टपैलु खेळाडू घडविण्यावर अधिक भर दिली जात आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्लीचे
लेव्हल थ्री प्रशिक्षक राकेश शर्मा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला...
आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धेने एका छताखाली आणले आहे. इतकेच काय तर स्थानिक क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, ख्रिस गेल, रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, यांसारख्या आजी-माजी खेळाडूंसमवेत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे अनुभव विश्वदेखील समृद्ध होण्यास मदत होत आहे.
तसेच ज्या खेळाडूंना केवळ पडद्यावरच खेळताना पाहिले आहे, त्यांच्या बरोबर बसण्याची मिळालेली संधी देखील खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत करते.
शर्मा म्हणाले, टी-टष्ट्वेन्टी मुळे क्रिकेट फलंदाजांचा खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक संघाचा कल हा अष्टपैलु खेळाडू घडविण्याकडे असतो.
कारण सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून
वीस-पंचवीस धावा जमविल्यास संघाला ते फायदेशीर ठरु शकते. याचा अर्थ केवळ गोलंजाद हवा नसतो असे नाही. प्रत्येक सामन्यात सरासरी दोन बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज, अथवा जॉन्टी ऱ्होड्स सारखा अफलातून क्षेत्ररक्षक असेल तरीही प्रतिस्पर्ध्यावर दडपण येतेच. त्यामुळे असा खेळाडू संघाना हवाच असतो.
तसेच खेळाडू संघ अडचणीत असताना कशी कामगिरी करतो, दडपणात तो कसा खेळ कररु शकतो, केवळ फटकेबाजीचा विचार करतो की, फटका मारण्यास योग्य असलेल्या चेंडूची खेळाडू वाट पाहतो, याचाही विचार त्याची खेळाची पद्धत ठरविण्यास उपयोगी ठरते.
एखादा खेळाडू जर सलग ३० ते ४० धावा काढून बाद होत असेल, तर तो लवकर आपला संयम घालवून बाद होतो की काय याचाही विचार केला जातो. त्या नुसार खेळाडूच्या कमकुवत बाजूवर काम केले जाते, असे शर्मा म्हणाले.

Web Title: 20-T per cent all-rounder in the air ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.