‘२० वर्षांपूर्वी फिक्सिंगने गाठली होती परिसीमा’

By admin | Published: October 18, 2016 04:20 AM2016-10-18T04:20:20+5:302016-10-18T04:20:20+5:30

१९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रूम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता

'20 years ago fixing reached the limit' | ‘२० वर्षांपूर्वी फिक्सिंगने गाठली होती परिसीमा’

‘२० वर्षांपूर्वी फिक्सिंगने गाठली होती परिसीमा’

Next


कराची : १९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रूम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता, असा दावा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला.
अख्तरने सांगितले, ‘‘१९९६ मध्ये आमच्या ड्रेसिंग रूममधील माहोल सर्वांत खराब झाला होता, हे मी विश्वासाने सांगतो. क्रिकेट वगळता अन्य बाबींचा वावर सुरू होता. ड्रेसिंग रूममध्ये क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते.’’
पाकिस्तानचा माजी दिग्गज जावेद मियाँदाद व माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यातील मतभेदांवर तोडगा निघाल्यानंतर अख्तरने हा नवा वाद उकरला. यामुळे मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा डोके वर काढणार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: '20 years ago fixing reached the limit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.