२०१२ - कोलकाता जितबो रे

By admin | Published: April 8, 2015 03:07 PM2015-04-08T15:07:03+5:302015-04-08T15:10:14+5:30

आयपीएलच्या समितीने कोच्ची टस्कर्सला आयपीएलमधून निलंबित केल्याने आयपीएलच्या पाचव्या पर्वातील संघांची संख्या नऊवर आली.

2012 - Kolkata Jitu Ray | २०१२ - कोलकाता जितबो रे

२०१२ - कोलकाता जितबो रे

Next
>आयपीएलच्या समितीने कोच्ची टस्कर्सला आयपीएलमधून निलंबित केल्याने आयपीएलच्या पाचव्या पर्वातील संघांची संख्या नऊवर आली. पाचव्या पर्वातही वादाची मालिका सुरुच राहिली. पुणे वॉरियर्सची मालकी असलेल्या सहारा समुहाचे बीसीसीआयसोबत वाजले. आयपीएलच्या लिलावात सहभागी न होता सहाराने बीसीसीआयला दणका दिला. अखेर बीसीसीआय व सहारा यांच्यातील वादावर तोडगा निघाला व पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले. ४ एप्रिल २०१२ रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्याने पाचव्या पर्वाचे बिगूल वाजले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईचा आठ विकेट्सने पराभव केला.
आयपीएलच्या यापूर्वीच्या पर्वात निराशाजनक कामगिरी करणा-या शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने पाचव्या पर्वात कात टाकली. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये कोलकाताची गाठ होती ती सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणा-या चेन्नई सुपर किंग्जशी. चेन्नई सुपर किंग्जने नावाला साजेशी कामगिरी करत कोलकात्यासमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र लढवय्या कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करत पाच विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.  

Web Title: 2012 - Kolkata Jitu Ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.