२०१४ - कोलकाता पुन्हा विजेता
By admin | Published: April 8, 2015 03:11 PM2015-04-08T15:11:58+5:302015-04-08T15:11:58+5:30
स्पॉट फिक्सिंग व बेटिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या आयपीएलचे सातवे पर्व लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पार पडले.
Next
>स्पॉट फिक्सिंग व बेटिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या आयपीएलचे सातवे पर्व लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पार पडले. निवडणुकांमुळे सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त पुरवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आयपीएलचे सातवे पर्व पुन्हा एकदा भारताबाहेर रंगले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगलेल्या या पर्वाला स्थानिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे शेवटचे सामने भारतातच रंगले.
पुणे वॉरियर्सने आयपीएलमधून माघार घेतल्याने संघाची संख्या पुन्हा एकदा ८ वर आली. १८ एप्रिल २०१४ रोजी अबूधाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात पहिला सामना पार पडला. या सामन्यात किंग्स इलेव्हनने सहा विकेट्सनी विजय मिळवला. सुरुवातीच्या सात पैकी दोन सामन्यांमध्येच विजय मिळवणा-या कोलकाता नाईट रायडर्सने स्पर्धेत पुनरागमन केले व स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले. तर पंजाबनेही सातत्त्यपूर्ण कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर तीन विकेट्सनी विजय मिळवत दुस-यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांची मालक हे बॉलीवूडमधील चांगले मित्र आहेत. प्रीती झिंटा ही पंजाब तर शाहरुख खान हा कोलकाता संघाचा मालक आहे.