Asian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:36 PM2018-08-17T16:36:23+5:302018-08-18T09:51:32+5:30
Asian Games 2018: "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे.
मुंबई - "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. जवळपास 45 देशांतील हजारो खेळाडू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी वर्षानुवर्षे आशियाई स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मात्र, त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू जकार्ता येथे दाखल झाले आहेत.
अनुभव खेळाडू आणि युवा जोश यांची योग्य सांगड यंदाच्या भारतीय चमूत दिसत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताने 1951च्या नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत सर्वाधिक 15 सुवर्णपदक जिंकले होते आणि सुवर्णपदकाचा हा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धा आणि भारत याबाबत चला जाणून घेऊया..
भारताने आत्तापर्यंत सर्वात मोठं पथक पाठवले आहे.
572 खेळाडू ( 312 पुरूष व 260 महिला)
ध्वजधारक - नीरज चोप्रा ( भालाफेकपटू)
45 पैकी 36 क्रीडा प्रकारात भारत सहभाग घेणार आहे.
My Best Wishes to all the Indian Athletes at the #NontonAsianGames@asiangames2018#AsianGames2018
— Ashwin Ravichandran (@ashwinravi99) August 17, 2018
भारताची कामगिरी
एकूण 617 पदकं - 139 सुवर्ण, 177 रौप्य आणि 298 कांस्य
2010च्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक 65 पदकं जिंकली आहेत. ( 14 सुवर्ण, 17 रौप्य व 34 कांस्य)
1951 च्या नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत भारताने 51 आणि 1982 व 2014 मध्ये प्रत्येकी 57 पदकं जिंकली आहेत.
पदकतालिकेत भारतीय संघ केवळ दोनदाच अव्वल आठ संघांमध्ये स्थान पटकावू शकला नाही. 1990 मध्ये भारत 11व्या, तर 1998 मध्ये भारत 9व्या स्थानावर होता.
भारताच्या एकूण 139 सुवर्णपदकांमध्ये अॅथलेटिक्सचा ( 72) मोठा वाटा आहे. त्यापाठोपाठ कुस्ती व कबड्डी ( प्रत्येकी 9) यांचा क्रमांक येतो.
I saw the pics of the 8 medals I’ve been able to win and I smiled instantly 😀as I am at home for probably the biggest ‘MATCH’ of my life and not with you guys, here’s wishing all the athletes,specially the tennis team all the best for the games from tomm!! 💪🏽 @asiangames2018pic.twitter.com/xXrIdo6DaL
— Sania Mirza (@MirzaSania) August 17, 2018
तारीख - 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर
वेळ - सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत
थेट प्रक्षेपण - सोनी टेन 1, सोनी टेन 2, सोनी टेन 3