Shocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:15 PM2020-05-09T13:15:06+5:302020-05-09T13:16:56+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, काही माथेफिरूंकडून पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात पोलिसाला हात गमवावा लागला होता. आता आणखी एक घटना समोर येत आहे. त्यात पंजाब पोलिसानं गोळी झाडल्यामुळे 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ
पंजाब येथील कपुरथाला जिल्ह्यातील ही घटना आहे. कर्फ्यूत गाडी अडवत असताना या मुलांकडून हल्ला होईल, अशी भीती त्या पोलिसाला वाटली आणि त्यानं गोळी चालवली. सहाय्यक पोलीस अधिकारी परमजीत सिंग असे त्या पोलिसाचे नाव आहे आणि त्यानं झाडलेल्या गोळीमुळे अरविंदरजीत सिंगचा मृत्यू झाला, तर परदीप सिंग गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री लखन के पड्डा गावाजवळ ही घटना घडली.
मित्राला सोडण्यासाठी परमजीत सिंग कारमधून जात होते. तेव्हा रात्री 10च्या सुमारास त्यांच्या गाडी शेजारी दुसरी गाडी येताना त्यांना दिसली. कर्फ्यू असताना ही गाडी थांबवण्याचा ललिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. कार थांबल्यानंतर ती पोरं हल्ला करतील या भीतीनं पोलिसांनी गोळ्या झाडल्या. यात कबड्डीपटूचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मित्राला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यात कोणताही वैयक्तिक मतभेद नव्हते आणि हा प्रसंग गोंधळामुळे घडली.
लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!
अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!
Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत
Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत