हिमाचल ८ बाद २४८

By admin | Published: November 22, 2014 11:29 PM2014-11-22T23:29:55+5:302014-11-22T23:29:55+5:30

कूच बिहार क्रिकेट चषक : अमूल्य पांढरेकरचे ४ बळी

248 after Himachal 8 | हिमाचल ८ बाद २४८

हिमाचल ८ बाद २४८

Next
च बिहार क्रिकेट चषक : अमूल्य पांढरेकरचे ४ बळी
पणजी : अमतार (हिमाचल प्रदेश) येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात हिमाचल प्रदेशने गोव्याविरुद्ध पहिल्या दिवशी ९३ षटकांत ८ बाद २४८ धावा केल्या. त्यांच्या ए. के.बैन्स याने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हिमाचलचा ए. शर्मा (२९), तर जसवाल १२ धावांवर खेळत आहे. गोव्याकडून अमूल्य पांढरेकरने सर्वाधिक ४ बळी घेतले.
अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येत आहे. सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय लक्ष्य गर्गने सार्थ ठरवला. त्याने सलामीवीर पी. खंडुरी याला पायचित बाद करीत पहिला बळी मिळूवन दिला. त्यानंतर मात्र हिमाचल प्रदेशच्या ए. के. बैन्स (७७), ठाकूर (४६), रांगी (४६) यांनी उत्तम फटकेबाजी केली. त्यामुळे हिमाचलने ३ बाद १४० धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. अमूल्य पांढरेकरने ठाकूर आणि रांगी या दोघांनाही तंबूत पाठवत गोव्याचा मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर नेगी, वालिया, यादव या फलंदाजांना झटपट बाद करण्यात गोव्याने यश मिळवले. यात अमूल्यने चार, लक्ष्य आणि वेदांत नाईक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: 248 after Himachal 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.