आरोपी जेकब मार्टिनला ३० लाख

By admin | Published: December 17, 2015 01:33 AM2015-12-17T01:33:24+5:302015-12-17T01:33:24+5:30

आयपीएलच्या २०१३ च्या पर्वात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक झालेले आरोपी एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांचे मानधन गोठविणाऱ्या बीसीसीआयने अटक झालेला

30 million to the accused Jacob Martin | आरोपी जेकब मार्टिनला ३० लाख

आरोपी जेकब मार्टिनला ३० लाख

Next

नवी दिल्ली : आयपीएलच्या २०१३ च्या पर्वात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक झालेले आरोपी एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांचे मानधन गोठविणाऱ्या बीसीसीआयने अटक झालेला अन्य एक खेळाडू जेकब मार्टिन याच्यासाठी वेगळे मापदंड आकारले आहेत.
मार्टिनला २७ एप्रिल २०११ मध्ये दिल्लीत अटक झाली. बनावट क्रिकेट संघ तयार करून निमेश कुमार नावाच्या खेळाडूचा खोटा व्हिसा तयार करून ब्रिटनला पाठविल्याचा त्याच्यावर आरोप होता. मार्टिनला नंतर जामीन मिळाला. या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. बीसीसीआयच्या वेबसाईटवर क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या एकरकमी लाभधारकांच्या यादीत
११८ व्या स्थानावर मार्टिनचे नाव
आहे.
भारतासाठी दहा वन डे खेळणाऱ्या बडोद्याच्या या माजी फलंदाजाला बीसीसीआयने ३० लाख रुपये दिले. या महिन्याच्या सुरुवातीस आरोप निश्चित करण्यास आव्हान देणारी मार्टिनची याचिका दिल्लीच्या एका न्यायालयाने फेटाळली होती. मार्टिनच्या रकमेस आधीच्या आर्थिक समितीने मंजुरी दिली. या समितीच्या एका सदस्याने मार्टिनला अटक झाल्याची माहिती नसल्याचे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: 30 million to the accused Jacob Martin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.