कोल्हापूरच्या ३३ जणांची राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 10:47 AM2021-03-05T10:47:49+5:302021-03-05T10:49:51+5:30
sports kolhapur-आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ व कुमार गट राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या ३३ खेळाडूंची निवड झाली.
कोल्हापूर : आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ व कुमार गट राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या ३३ खेळाडूंची निवड झाली.
निवड झालेले खेळाडू असे : वरिष्ठ गट- अक्षय पाटील (तिटवे), रोहित पाटील (कोगे), संदीप चौगले (माजगाव), प्रवीण गावडे (शिरोळ), शुभम मठपती (इचलकरंजी), ऋतुराज पाटील (कुरुकली), श्रेअस चौगुले (इचलकरंजी) पवन देसाई (कडगाव), चेतन गोरल (कोल्हापूर), विशाल कळंत्रे (बाचणी). मुलींमध्ये सलोनी आरेकर, हर्षदा कचरे (इचलकरंजी), शकुंतला जाधव (कोल्हापूर), पूजा खोत (वडणगे) यांचा समावेश आहे.
कनिष्ठ गटात सुदर्शन पाटील (हसूर दुमाला), संकेत सिद्धनेर्ली, प्रतीक सुतार (नेर्ली), ओंकार पाटील (बाचणी), हर्षवर्धन लाड (बाचणी) यांचा, तर मुलींमध्ये दीपा बागडी, जैबान किल्लेदार (कोल्हापूर), कोमल कोरवी, आदिती चेचर (वडणगे), तर कुमार गटात ऋतुराज निंबाळकर (मौजे सांगाव), सोहम सावेकर, ऋषिकेश निर्मळ (बाचणी), प्रणव पाडेकर, रोहित पाटील, ऋषिकेश देवकर, पार्थ सावंत, अज्ञेश मुडशिंगीकर (बाचणी), प्रथमेश वाईंगडे (सांबरे), सिद्धार्थ कदम (माजगाव), तर मुलींमध्ये श्रद्धा पाटील, अनघा पाटील, अक्षता पाटील, ऋतुजा उकिरडे, श्रेया चौगुले, गिरिजा थोरात, विशाखा कवडे (इचलकरंजी), अंकिता चेचर (वडणगे), देविका देसाई (कोल्हापूर ) यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना ज्येष्ठ मार्गदर्शक बिभीषण पाटील, दक्षिण आशियाई रस्सीखेच संघटनेच्या सचिव माधवी पाटील, महासचिव मदन मेह, राज्य संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले, जिल्हा सचिव दया कावरे, पांडुरंग पाटील, विवेक हिरेमठ, अक्षय पाटील, रोहित पाटील, संदीप चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.