बेस्ट कर्मचा-यांना ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर

By admin | Published: October 30, 2015 02:58 PM2015-10-30T14:58:57+5:302015-10-30T14:59:09+5:30

बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे.

5 thousand bonus bonus for best employees | बेस्ट कर्मचा-यांना ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर

बेस्ट कर्मचा-यांना ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना बेस्टच्या कर्मचा-यांच्या बोनसचा प्रश्न अखेर सुटला असून बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचे निश्चित झाले आहे. बेस्ट अध्यक्ष अरूण दुधवडकर यांनी शुक्रवारी दुपारी ही घोषणा केली. 
राज्य सरकारने बेस्टला अनुदान द्यावे, अशी मागणी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेनेने केली होती. महत्त्वाचे म्हणजे बोनससाठी लागणारी रक्कमही सरकारनेच द्यावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि आमदार सुनील प्रभू यांनी केली. परिणामी महापालिकेत कायमच खटके उडणाऱ्या भाजपा-शिवसेनेपैकी सेनेने बेस्टच्या बोनसचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकल्याने बेस्ट बोनसला राजकारणाचा रंग चढू लागला होता. 
 बेस्ट आर्थिक अडचणीत असल्याने कर्मचारी वर्गाला गेल्या तीन वर्षांपासून बोनस देण्यात आलेला नाही. या वर्षीही प्रशासनाने हेच कारण पुढे करत बोनस नाकारला होता, मात्र त्यानंतर संघटनांनी संपाचा इशारा दिला होता. अखेर आज हा तिढा सुटला असून बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला असून दिवाळीच्या तोंडावर बेस्ट कर्मचा-यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. 

Web Title: 5 thousand bonus bonus for best employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.