प्रशिक्षकपदासाठी तब्बल ५७ अर्ज
By admin | Published: June 13, 2016 06:11 AM2016-06-13T06:11:52+5:302016-06-13T06:11:52+5:30
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून ५७ अर्ज आले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिली.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून ५७ अर्ज आले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिली.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १० जून होती. रवी शास्त्री यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची दीड वर्षे धुरा सांभाळली असून, तेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत. या शिवाय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील, माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत, माजी सहप्रशिक्षक रॉबिन सिंग, विक्रम राठोड व बलविंदर सिंह संधू हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
बोर्डाचे सचिव प्राप्त नावांतून योग्य व्यक्तींच्या नावांची प्रथामिक चाळणी करतील. त्यानंतर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सल्लागार समिती प्रशिक्षकपदाच्या नावावर मोहोर उमटवितील. या महिन्यात होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)