टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसी सामना अधिकाऱ्यांच्या सूचित ६ भारतीय

By admin | Published: February 26, 2016 04:01 AM2016-02-26T04:01:25+5:302016-02-26T04:01:25+5:30

मॅच रेफरी जवागल श्रीनाथसह सहा भारतीय पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आयसीसीच्या ३१ सदस्यीय प्लेइंग कंट्रोल टीमचे सदस्य असतील. त्यात प्रथमच चार महिला

6 Indian informers of ICC match officials for T-20 World Cup | टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसी सामना अधिकाऱ्यांच्या सूचित ६ भारतीय

टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसी सामना अधिकाऱ्यांच्या सूचित ६ भारतीय

Next

दुबई : मॅच रेफरी जवागल श्रीनाथसह सहा भारतीय पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आयसीसीच्या ३१ सदस्यीय प्लेइंग कंट्रोल टीमचे सदस्य असतील. त्यात प्रथमच चार महिला सामना अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने त्यांच्या निवेदनात म्हटले, ‘मजबूत प्लेइंग कंट्रोल टीममध्ये आयसीसी मॅच रेफरी आणि अम्पायरांच्या एलिट पॅनलचे १२ सदस्य, आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनलचे १० सदस्य आणि आयसीसी असोसिएट व संलग्नित आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनलमधील २ सदस्यांचाही त्यात समावेश आहे.’
८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत होणाऱ्या स्पर्धेत पंचांच्या पॅनलमध्ये दोन महिला पंच न्यूझीलंडची कॅथलिन क्रॉस आणि आॅस्ट्रेलियाची क्लेयर पोलोसाकदेखील आहेत. हे दोन्ही पंच थायलंडमध्ये महिला टी-२० वर्ल्डकप क्वॉलिफायरमध्येदेखील अम्पयार होत्या.क्रॉस १६ मार्चला चेन्नईत पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या महिला संघांच्या सामन्यात अनिल चौधरीसोबत पंचांची जबाबदारी पार पाडेल. ती आयसीसी टी-२0 वर्ल्डकपमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडणारी पहिली महिला असेल.
(वृत्तसंस्था)

२४ पैकी १२ पंच आयसीसी टी-२0 वर्ल्डकपमध्ये पदार्पण करतील. त्यात अनिल चौधरी, जोहान क्लोएटे, कॅथलिन क्रास, साइमन फ्राय, ख्रिस गाफेनी, मायकल गॉ, विनीत कुलकर्णी, सी. के. नंदन, रुचिरा पेलियागुरुगे, क्लेयर पोलोसाक, सी. शमसुद्दीन आणि जोएल विल्सन यांचा आहे.
मॅच रेफरी पुढीलप्रमाणे असतील : डेव्हिड बून, ख्रिस ब्रॉड, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँडी पायक्राफ्ट, रिची रिचडर््सन, जवागल श्रीनाथ. अम्पायर : अनिल चौधरी, जोहान क्लोएटे, कॅथी क्रास, अलीम दर, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, साइमन फ्राय, ख्रिस गाफाने, माइकल गॉ, इयान गूड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटरबोरो, विनीत कुलकर्णी, नाइजेल लोंग, रेनमोर मार्तिनेज, सी. के. नंदन, ब्रूस ओक्सेनफोर्ड, रुचिरा पी., क्लेयर पोलोसाक, पाल रेफील, सी. शमसुद्दीन, रवी सुंदरम, राड टकर आणि जोएल विल्सन.

Web Title: 6 Indian informers of ICC match officials for T-20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.