यंदाच्या आयपीएलच्या प्रत्येक मॅचवर 700 कोटींची बोली

By admin | Published: April 8, 2016 07:09 PM2016-04-08T19:09:16+5:302016-04-10T14:25:43+5:30

आयपीएल 2016च्या वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

700 crore bid for every match of the IPL this year | यंदाच्या आयपीएलच्या प्रत्येक मॅचवर 700 कोटींची बोली

यंदाच्या आयपीएलच्या प्रत्येक मॅचवर 700 कोटींची बोली

Next

- डिप्पी वंकानी
मुंबई, दि. ८-  आयपीएल 2016च्या वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचला उद्यापासून सुरुवात होणार आहे. उद्या मुंबई इंडियन्स आणि रायझिंग सन पुणे या दोन संघांमध्ये हा सामना होणार आहे. मात्र यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये बुकींनी रॉयल्स चॅलेंजर बँगलोर संघ जिंकणार असल्याचं सांगत त्याला अधिक पसंती दर्शवली आहे. मुंबई इंडियन्स चांगले खेळून जेव्हा टी-20 वर्ल्डकपसाठी दावेदारी करतील. त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब त्यांना जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. 56 सामन्यांवर जवळपास 600 ते 700 कोटींची बोली लागल्याचं समजतं आहे. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये 65 हजार ते 70 हजार कोटींची बोलीच्या माध्यमातून उलाढाल होऊ शकते. जो संघ आयपीएल सिझनमध्ये पहिल्या 10 ओव्हर्समध्ये जितके जास्त रन्स बनवेल, त्या संघावर सर्वाधिक जास्त बोली लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका बुकीनं लोकमतला दिली आहे. तसेच, सिझनदरम्यान 300 कोटींची उलाढाल होऊ शकते, मात्र फायनलला प्रत्येक मॅचवर जवळपास 600 ते 700 कोटींची बोली लागू शकते.  बुकींच्या मते, नवी बोली मॅच सुरू असताना लागू शकते. शेवटच्या चार कॉलिफायर आणि फायनल मॅचमध्ये नवी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंटरला या टी-20च्या फायनल मॅचदरम्यान वेस्ट इंडिज अनपेक्षितरीत्या जिंकल्यानं  मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे ते चालू मॅचमधून टी-20चा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करतील, अशीही माहिती बुकीनं यावेळी दिली. 


आयपीएलमध्ये बोली लागलेले संघ
टीम                                रेट
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर      3 रु.
मुंबई इंडियन्स                  4.90 रु.
रायझिंग पुणे सुप्रिजन        5.20 रु.
गुजरात लायन्स                 7 रु.
कोलकाता नाईट रायडर्स   7.60 रु.
सनराईज हैदराबाद           11 रु.
दिल्ली डेअर डेव्हिल्स        13 रु.
किंग्ज इलेव्हन पंजाब       19 रु.

Web Title: 700 crore bid for every match of the IPL this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.