डीआरएसमुळे ९८.५ टक्के निर्णय योग्य
By admin | Published: February 17, 2017 12:22 AM2017-02-17T00:22:16+5:302017-02-17T00:22:16+5:30
पंचांच्या निर्णयाची समीक्षाप्रणालीमुळे (डीआरएस) ९८.५ टक्के निर्णय योग्य ठरल्याची माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन
दुबई : पंचांच्या निर्णयाची समीक्षाप्रणालीमुळे (डीआरएस) ९८.५ टक्के निर्णय योग्य ठरल्याची माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी गुरुवारी दिली. आधी हे प्रमाण ९४ टक्के इतके होते. रिचर्डसन यांनी आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देताना आयसीसीला मॅच अधिकाऱ्यांच्या पॅनलवर गर्व असल्याचे म्हटले आहे. डीआरएस लागू झाल्यापासून ९८.५ टक्के निर्णय अचूक देण्यात आम्ही यशस्वी झालो असे सांगितले.आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश!आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी काय डावपेच आखायचे, याचा निर्णय आगामी काही महिन्यांत घ्यावा लागेल. आमच्या सदस्य देशांचा काय विचार आहे, हे जाणून घ्यावे लागेल. कुणाला काही आक्षेप नसल्यास खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यास हरकत नाही. येत्या सहा महिन्यांत यावर निर्णय अपेक्षित असल्याचे रिचर्डसन यांचे मत होते.डोपिंगसाठी रक्ताचे नमुने घेणार खेळ डोपिंगमुक्त राहावा यासाठी यंदाच्या सत्रापासून खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. रिचर्डसन म्हणाले,‘खेळाचे पावित्र्य कायम राखणे आयसीसीचे मुख्य लक्ष्य आहे. क्रिकेट स्वच्छ तसेच पारदर्शी राहावे आणि खेळातील भ्रष्टाचाराविरुद्ध जागतिक स्तरावर लढा देण्यासाठी नेतृत्व करायचे असल्याने खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेणे अनिवार्य करण्यात येईल.’(वृत्तसंस्था)