आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 08:52 PM2017-09-03T20:52:01+5:302017-09-03T21:16:44+5:30
आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.
नवी दिल्ली, दि. 3 - आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटनचा लोकप्रिय बॉक्सर आमीर खान पत्नी फरयाल मकदुम हिला घटस्फोट देत आहे. त्यासाठी त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम पत्नीला द्यावी लागणार आहे. द डेली स्टारने या संदर्भातील बातमी दिली आहे. त्यानुसार आमीर खानला 100 कोटी रुपये म्हणजे १ अब्ज रूपये मोजावे लागतील असे सांगितले जात आहे. 2013 मध्ये आमीर विवाहबद्ध झाला होता.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सॉलिसिटर जनरल हाराल्ड वॉक्स यांच्या म्हणण्यानुसार आमीरने घटस्फोट घेतला तर त्याला किमान 1 अब्ज रूयपे पत्नीला द्यावे लागतील. आमीरची बायको फरयाल हिच्या म्हणण्यानुसार आमीर सतत बायकांच्या गराड्यात असतो, दारू पितो, पार्ट्या करतो आणि स्वतःला तरीही मुसलमान म्हणवतो. याउलट आमीरच्या म्हणण्यानुसार त्याची बायको त्याच्याशी प्रामाणिक नाही व दुसर्या बॉक्सरबरोबर तिचे संबंध आहेत. फरयाल ही अमेरिकन मॉडेल असून तिला आमीरपासून एक मुलगी आहे व दुसर्यांदा ती प्रेग्नंट आहे.
आमीरकडे ७ लाख पौंड किंमतीच्या कार्स, 16 लाख पौंड किमतीचा महाल शिवाय 25 दशलक्ष पौंडांची मालमत्ता आहे. या 25 दशलक्षांपैकी निम्मी म्हणजे किमान 12.5 दशलक्ष पौंड त्याला पत्त्नीला मुलांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणून द्यावे लागतील.
आमिरच्या घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. फरयालने आरोप केला होता की, आमिरचे आई-वडिल व त्याची बहिण-भाऊ माझा मानसिक छळ करत आहेत. तसेच कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याचा दावाही तिने केला होता. फरयालने हा ही आरोप केला होता की, जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हापासूनच त्यांनी घटस्फोटासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
आमीर खानचा सेक्स टेप झाला होता लीक
आमीर खानचा एक सेक्स टेप पॉर्न साईटवर लीक झाला होता. धक्कादायक बाब ही की, या व्हिडिओ लीक करण्यामागे त्याची मॉडेल पत्नी फरयाल मखदूम हिचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या सेक्स टेपमध्ये 30 वर्षाचा आमीर खान हा अमेरिकेच्या एका मॉडेलसोबत होता. स्काईपवर बोलताना त्याने सेक्शुअल अॅक्ट करणे सुरु केले. रिपोर्ट्समध्ये हा दावा सुद्धा करण्यात आला आहे की, बॉक्सर आमिरचे आणखी तीन सेक्स व्हिडिओज सुद्धा त्या वेबसाईट्सला देण्याची ऑफर दिली होती.