अभिजित गुप्ताची ऐतिहासिक कामगिरी

By Admin | Published: October 24, 2016 04:18 AM2016-10-24T04:18:07+5:302016-10-24T04:18:07+5:30

ग्रॅण्डमास्टर आणि राष्ट्रकुल चॅम्पियन अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले

Abhijit Gupta's historical performance | अभिजित गुप्ताची ऐतिहासिक कामगिरी

अभिजित गुप्ताची ऐतिहासिक कामगिरी

googlenewsNext

नवी दिल्ली : ग्रॅण्डमास्टर आणि राष्ट्रकुल चॅम्पियन अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. फिडे ओपन स्पर्धेत सलग दोन विजेतेपद पटकावणारा तो पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
गत चॅम्पियन व अव्वल मानांकित अभिजितने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना ९ पैकी ७.५
गुणांची कमाई केली आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या गॅ्रण्डमास्टर संदीपन चंदाच्या तुलनेत त्याने आघाडी घेतली होती. भारतीय ग्रॅण्डमास्टर एम. आर. ललित बाबूने तिसरे तर ग्रॅण्डमास्टर एम. श्यामसुंदरने चौथे स्थान पटकावले. अभिजितने या स्पर्धेत सलग चार विजय मिळवल्यानंतर ललित बाबूसोबतची लढत बरोबरीत सोडवली. सहाव्या फेरीत अभिजितने मायकल डी जोंगविरुद्ध विजय नोंदवला तर सातव्या फेरीत मायदेशातील सहकारी एस. नितीनविरुद्ध सहज विजय मिळवला.(वृत्तसंस्था)

Web Title: Abhijit Gupta's historical performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.