अभिजित सावंतची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:00 AM2018-05-16T02:00:27+5:302018-05-16T02:05:46+5:30
कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे.
लासुर्णे : कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे.
सन २०१४ ते २०१८ पर्यंत बेंगलोर, गोंदिया, छत्तीसगढ, पॉण्डेचरी, मॉरिशस, दुबई इ. स्तरावर योगा स्पर्धेत सहभागी होत तालुका, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करीत अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत. सावंत सध्या अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सैनिक शाळेत नुकताच इ. ९वीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.
चालू शैक्षणिक वर्षांत १० वीमध्ये शिक्षण घेत योगाचा सराव सुरु ठेवणार असल्याचे सावंतने
सांगितले. बालपणापासून आवड असलेल्या योगासनामुळे आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले
आहे.
या निवडीबद्दल साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिजित सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, माजी उपसरपंच अंबादास कवळे, पैलवान नितीन माने व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
विविध ठिकाणच्या योगा स्पर्धेसाठी विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे, सचिव चिमणभाऊ डांगे, व्यवस्थापक सुनील शिनगारे, प्राचार्य सुभाष पाटील, मुख्याध्यापक महेश जाधव, क्रीडा मार्गदर्शक परेश पाटील, योगा शिक्षक सुशांत घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.