अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 04:45 AM2019-08-31T04:45:19+5:302019-08-31T04:45:53+5:30

नेमबाजी विश्वचषक : रौप्य पदकासह संजीव राजपूतने मिळवले आॅलिम्पिक तिकिट

Abhishek Verma wins gold and Saurabh Chaudhary bronze | अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

Next

रिओ : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गुरुवारी अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली.


तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावले. सौरभने यंदा पाच सुवर्णांची कमाई केली असून वर्षभरातील हे त्याचे सहावे आयएसएसएफ विश्वपदक होते. भारत पदकतालिकेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह अव्वल स्थानावर कायम आहे. चिंकी यादव २५ मीटर महिला पिस्तुलमध्ये अंतिम पात्रता मार्कपासून एका गुणाने माघारली. ती ५८४ गुणांसह दहाव्या स्थानी आली.
अनुराज सिंग ५७९ गुणांसह २५ व्या आणि अभिज्ञा पाटील ५७२ गुणांसह ५३ व्या सञथानावर राहीली. चैनसिंग आणि पारूल कुमार यांना ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये क्रमश: ४९ आणि ५७ वे स्थान मिळाले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी क्रमश: ५८० आणि ५८३ गुणांची कमाई केली. दोघींनीही आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्यसिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये ११६६ आणि ११६५ गुण संपादन केले. (वृत्तसंस्था)
१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आॅलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चित केला आहे. याव्यतिरीक्त संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन अंतिम फेरीमध्ये रौप्य जिंकून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे.


तांत्रिक बिघाडामुळे अडचण
५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करीत आॅलिम्पिक कोटा मिळवला. गुण दर्शविणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आल्याने दडपण येताच तो त्रस्त होता. संजीवने स्वत: हा खुलासा केला.
३८ वर्षांच्या संजीवने अंतिम फेरीत ४६२ गुणांची कमाई केली. तो क्रोएशियाचा पीटर गोर्सा (४६२.२) नंतर दुसºया स्थानी राहिला. संजीव म्हणाला, ‘मी संपूर्ण पात्रता फेरीदरम्यान त्रस्त होतो. माझ्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आला होता. याचा विरोध केला. यावर अतिरिक्त शॉट मंजूर होताच मी दहा गुण घेत पात्रता गाठली. माझे गुण ११८० नव्हे, तर ११८१ असायला हवे असे माझे मत होते.’ राजपूत अखेरच्या शॉटमध्ये थोडा मागे राहिल्याने त्याचे सुवर्ण हुकले. ‘दीर्घकाळानंतर फायनलमध्ये खेळल्याने माझ्यावर दडपण आले होते,’ असे त्याने रौप्य जिंकल्यानंतर सांगितले.

Web Title: Abhishek Verma wins gold and Saurabh Chaudhary bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.